जळगाव । महावितरण व ग्राहक संबंध बळकटीकरणाच्या हेतूने संवाद आवश्यक आहे. मोबाईल क्रमांकाची नोंदणी या दृष्टीने महत्वपुर्ण ठरणार आहे. ग्राहकांना वीज बिलांचा आणि वीज बंद असल्याच्या कालावधीची माहिती एसएमएस च्या माध्यमातून कळविण्यात येणार आहे. वीजग्राहकांना नजिकच्या वीज बील भरणा केंद्रात किंवा टोल फ्री क्रमांक किंवा एसएमएस व्दारे किंवा महावितरण मोबाईल पव्दारे यापैकी कोणत्याही एका पर्यायाव्दारे स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी असे आवाहन जळगांव परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री.ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.
14 लाख ग्राहकांची नोंदणी
जळगांव परिमंडळातील 1 लाख 91 हजार 478 वीज ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे. जळगांव मंडळातील 1 लाख 1 हजार 174, धुळे मंडळ 60 हजार 963 व नंदुरबार मंडळातील 29 हजार 341 वीज ग्राहकांनी मोबाईल क्रमांक नोंदणीस प्रतिसाद दिला आहे. यात जळगांव शहर विभाग अग्रेसर असून 42 हजार 775 ग्राहकांनी मोबाईल क्रमांक नोंदणी केली आहे. जळगांव परिमंडळात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषीपंपधारक व इतर असे एकूण 14 लाख 44 हजार ग्राहक आहेत.
मोबाईल पव्दारे माहिती प्रसारण
महावितरणने कर्मचार्यांसाठी तयार केलेल्या कर्मचारी मित्र या मोबाईल पव्दारे तांत्रिक बिघाड वा देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद असलेल्या वीजवाहिनीची नोंद घेण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधीत वीजवाहिनीवरील वीजग्राहकांच्या मोबाईलवर वीजबंद व पुर्ववत होण्याचे कालावधीची पुर्वसुचना व माहिती एसएमएस व्दारे कळविण्यात येणार आहे.