1 व 2 रोजी हुुतात्मा एक्स्प्रेस दौंडमार्गे धावणार

0

भुसावळ- अप 11025 व डाउन 11026 भुसावळ-पुणे हुतात्मा एक्सप्रेस कल्याणऐवजी मनमाड, दौंडमार्गे पुण्यापर्यंत धावणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोणावळा रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचे काम करण्यात येणार असल्याने 1 व 2 रोजी पॉवर आणि तांत्रिक ब्लाक घेण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अप हुतात्मा एक्स्प्रेस 1 व 2 रोजी मनमाड व तेथून दौंडमार्गे पुणे धावेल तर डाऊन हुतात्मा एक्स्प्रेस परतीच्या प्रवासातही कल्याणऐवजी दौंड, मनमाडमार्गे भुसावळपर्यंत धावणार आहे. रेल्वे प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन भुसावळ रेल्वे प्रशासनाने केले आहे.