जळगाव । महात्मा गांधी आणि कस्तुरबा यांच्या 150 व्या जयंतीच्या औचित्याने गांधी रिसर्च फाउंडेशन आणि गांधीयन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नॅशनल गांधीयन लिडर शप कॅम्प’ आयोजण्यात आला आहे. 1 ते 15 सप्टेंबर 2017 दरम्याने होणार्या या शिबिरात 18 राज्यांचे विद्यार्थी, युवा-युवती सहभागी होत आहेत. 1 सप्टेंबर रोजी गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात सकाळी 9.00 वाजता औपचारिक उद्घाटन होईल.
महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगांवक र, सेवादास दलिचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, डॉ. सुदर्शन अय्यंगार आदी मान्यवर उपस्थित असतील. युवा युवतींना महात्मा गांधीजींच्या नेतृत्व शैलीचा आजच्या व्यवहारी दृष्टिने सांगड घालून अभ्यास करता यावा, त्यांच्या कार्याची प्रेरणा घेता यावी या प्रमुख उद्देशाने या शिबिराची आखणी करण्यात आली आहे. यात तज्ज्ञ मान्यवरांचे अनुभव, विचार एकण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. यात ‘विचार कणिका’ अंतर्गत भगवान महावीर, गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त, गुरुनानक, कबीर, स्वामी विवेकानंद, टॉलस्टाय अशा प्रभावशाली व्यक्तीमत्त्वांबद्दल प्रेरणादायी बाबी सांगण्यात येतील. अत्यंत प्रेरणादायी व भरगच्च कार्यक्रम शिबिरार्थींसाठी होणार आहेत. या 15 दिवसांच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा असणार्यांनी गांधीतीर्थ येथील अश्विन झाला यांच्याशी 9404955272 अथवा 2260011 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. जैन इरिगेशनचे संस्थापक तथा गांधीतीर्थचे निर्माता मा. भवरलालजी जैन यांनी महात्मा गांधींची शिकवण भावी तरुण पिढीपर्यंत सहज पोहोचावी यासाठी गांधीतीर्थची निर्मिती केली आहे.