1 हजार गणेशोत्सव मंडळे मनपाच्या परवानगीच्या प्रतीक्षेत!

0

मुंबई । गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला असताना मुंबईतील तब्बल 1 हजार 511 पैकी अवघ्या 155 मंडळांच्या गणेश मंडपांना मुंबई महापालिकेने अनुमती दिली आहे. तब्बल 1 हजार 212 मंडळांचे अर्ज पालिका, पोलीस, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दल यांच्या परवानग्या न मिळाल्यामुळे लटकले आहेत. विविध वॉर्डांमधील 88 मंडळांचे अर्ज पालिका व अन्य सरकारी यंत्रणांनी नाकारले आहेत. पालिकेच्या जी दक्षिण वॉर्डात 94 मंडळांनी अर्ज केला असता, त्यापैकी दोन मंडळांचे अर्ज संमत झाले तर दोन मंडळांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत.

अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन. सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात आणि 4 रुपये 31 पैसे प्रति युनिट या सवलतीच्या दराने उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रति युनिट 3 रुपये 10 पैसे अधिक एक रुपया 21 पैसे वाहन आकार; तसेच इंधन अधिभार असे वीजदर आहेत. त्यामुळे नवी मुंबई येथील धार्मिक उत्सवांसाठी आपल्या नजीकच्या कार्यालयामार्फत अधिकृत वीजपुरवठा घ्यावा आणि सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व द्यावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

मंडळे पालिकेचे दार झिझवताहेेत
त्याखालोखाल पालिकेच्या एम पश्चिम चेंबूरमधील तब्बल 86 मंडळांचे अर्ज नाकारण्यात आले असूुन, तेथे अवघ्या एकच मंडळाचा अर्ज पालिका, पोलीस आणि अन्य यंत्रणांनी संमत केला आहे. एम पूर्वमधील गोवंडी आणि मानखुर्दमध्ये 83 मंडळांनी पालिका आणि पोलीस व अन्य यंत्रणांकडे परवानगी अर्ज पाठवले होते, त्यापैकी एकाही मंडळाचा अर्ज संमत झाला नाही. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या व रोहित्रांचा गणेशोत्सवातील तसेच मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत. वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते.