नगर । वीज ग्राहकांकडे विजेचे बिल मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे.हि थकबाकी वसुल करण्यासाठी महावितरण कंपनीने जोरदार मोहीम हाती घेतली आहे. दोन हजार रूपयापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या जिल्ह्यातील 1 हजार 892 वीज ग्राहकांची वीज प्रवाड तोडण्यात आला आहे. वीज ग्राहकांकडून विजेची वाढती मागणी व त्याचबरोबर वाढती थकबाकी यामुळे वीजवितरण कंपनीला आर्थिक भार सहन करावा आहे.त्यामुळे वीजवितरण कंपनीने थकबाकी वसुलीला प्राधान्य दिले गेले आहे. अखंडीत वीज सेवेसाठी ग्राहकांनी थकीत रक्कम जमा करण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
63 हजार थकबाकीदार ग्राहक
जिल्ह्यातील महावितरणच्या पाच विभागांतर्गत दोन हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी रक्कम असलेले घरगुती, वाणिज्य व औद्योगिक मिळून 63 हजार ग्राहक आहेत. या थकबाकीदार ग्राहकांकडे 27 कोटी 23 लाख रूपयाची वीजबीले थकीत आहे.वारंवार आवाहन करूनही ग्राहक थकबाकी जमा करीत नव्हते. यामुळे अशा ग्राहकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिले आहेत. थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता तसेच कायमस्वरूपी खंडित करण्याचे सांगण्यात आले आहे. 662 ग्राहकांची कायमस्वरूपी वीज तोडली. थकबाकी वसुली मोहिमेंतर्गत 1 हजार 892 ग्राहकांवर कारवाई करण्यात आला आहे. यापैकी 1 हजार 230 वीजग्राहकांचा तात्पुरत्या स्वरूपाचा वीज खंडित करण्यात आला आहे. तर 662 ग्राहकांची कायमस्वरुपाची वीज तोडण्यात आली आहे. दिवसेंदिवस थकबाकीमध्ये वाढ होत असल्याने बिल न भरणार्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरूच राहणार असून, पाचही विभागांच्या अभियंते, कनिष्ठ अभियंते व वायरमनपर्यंत सर्वांना तसे आदेश देण्यात आले आहेत.