रावेर पोलिसात गुन्हा दाखल
रावेर । चलनातून बाद झालेल्या एक कोटी तिस लाख रुपयाचे जुन्या नोटा बदलून नवीन चलनातील रक्कम देण्याचे सांगून एका इसमाचे अपहरण करून फरार झाल्याची घटना 11 रोजी घडली आहे. या संदर्भात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीचा शोध सुरु आहे. शेख साजिद शेख रहीम वय 24 (रा.उमरवाडा सूरत) व त्याच्या मित्र सैय्यद सोएब सैय्यद जफर (रा.उधना सूरत) हे दोघे त्यांच्या जवळील चलनातुन बाद झालेल्या जुन्या एक हजार व पाचशेच्या नोटा एकूण एक कोटी तीस लाख रुपये एक बॅगमध्ये भरून रावेरमध्ये आले व आरोपी हबीब बाबा (पूर्ण नाव माहित नाही) इमरान (नाव माहिती नाही) रा.भुसावळ व अन्य पाच ते सहा यांच्या कडे बदलून देण्यासाठी रावेर शहरातील बालाजी टोल काटया नजिक नोटांची भरेल बॅग दिली. आरोपी पैसे घेऊन पांढर्या रंगाच्या बुलेरो व निळ्या रंगाच्या गाडी बसून फिर्यादी याचा मित्र सै सोएब याच्याकडून अजुन पैसे मिळावे म्हणून अपहरण करून फरार झाले आहे. शेख साजिद यांच्या फिर्यादी वरुन रावेर पोलिस स्टेशना अपहरण,भादवी कलम 364,(अ) 365 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हाचा पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील व विशेष पथक तपास करीत आहेत.
Next Post