नवी दिल्ली । निश्चलीकरणानंतर सुरू केलेल्या भीम अॅपने जागतिक विक्रम केला. आतापर्यंत 1.70 कोटी वेळा जनतेकडून हे अॅपचे डाऊनलोड करण्यात आले आहे. ही माहिती नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी दिली.
मोदी सरकारने गेल्यावर्षी 30 डिसेंबर रोजी भीम अॅप सुरू केले होते. या अॅपचा उद्देश रोखविहीन व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु केले आहे. इंटरनेट सुविधा नसतांनाही हे अॅप सुरू असते. फोनच्या माध्यमातून युएसएसडी क्रमांक *99 डायल केल्यानंतर अॅपचे काम सुरु होईल. अॅप सुरू केल्यानंतर केवळ एका महिन्याच्या आत अॅण्ड्रॉईड फोनच्या माध्यमातून 50 लाखांपेक्षाही अधिक जणांनी ते डाऊनलोड केले. अॅपद्वारे पैसे पाठवण्यासाठी आपला बँकखाते क्रमांकाची नोंदणी करावी लागते. त्यानंतर एक यूपीआय पिनकोड क्रमांक तयार करावा लागतो, अशाप्रकारे या अॅपचे काम चालत असते.