मुंबई : मराठा समाजास आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीकरिता राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. मात्र, यावर अद्याप सरकारकडून कोणताही निर्णय घेतला जात नसल्याचे सांगत पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. 1 डिसेंबरपासून पुन्हा मोर्चे, आंदोलन करण्यात येईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
मराठा क्रांती ठोक मोर्चाची आढावा बैठक आज मंगळवारी घेण्यात आली. बैठकीत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील, रमेश केरे-पाटील, महेश राणे उपस्थित होते.