जळगाव | बेलखेडा, ता.धरणगाव जिल्हा जळगाव येथील रूग्ण संगीता राजेंद्र मगर यांची आर्थिक परिस्थिती अडचणीची असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाशी मदतीसाठी संपर्क केला होता, वैद्यकीय मदत कक्षाच्या जळगाव कार्यालयातून कर्करोगग्रस्त रूग्णाच्या मदतीसाठी लगेचच मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्ज भरून मंत्रालयात पाठपुरावा करण्यात आला.
जळगाव वैद्यकीय मदत कक्षाच्या पाठपुराव्यामुळे कर्करोग उपचारासाठी संगीता राजेंद्र मगर या रूग्णास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून नाशिक येथील एचसीजी मानवता कँन्सर हॉस्पिटल येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १ लाख रूपयांचे कर्करोगाच्या उपचारासाठी अर्थसहाय्या करण्यात आले, सदर रूग्णाच्या उपचाराचा खर्च भागवण्यासाठी निधी हा ३१ मे २०२३ रोजी हॉस्पिटलला वर्ग करण्यात आला आहे.
आर्थिक सहाय्य मिळाल्या बद्दल रूग्णाचे नातेवाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुख्यमंत्री सहाय्यता निधी मंत्रालय कक्षप्रमुख मंगेश चिवटे व वैद्यकीय मदत कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन जळगाव टिमचे आभार मानले आहे.