10 हजार रुपये किंमतीची भुसावळ शहरातून दुचाकी चोरट्यांनी लांबवली

Bike ride from Bhusawal city भुसावळ : शहरातील आशा हाईटसजवळून चोरट्यांनी दहा हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. ही घटना सोमवार, 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेनऊ दरम्यान घडली. या प्रकरणी शेख जुनेद मोहम्मद जमाल (मोहम्मदी नगर, भुसावळ) यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी चोर्‍या वाढल्या
शेख जुनेद यांच्या मालकिची दहा हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 ए.डब्ल्यू.0963) आशा हाईटसजवळील शॉप नंबर आठजवळील इलेक्ट्रीक दुकानासमोर लावली असता चोरट्यांनी संधी साधली. तपास हवालदार नेव्हील जॉर्ज करीत आहेत.