10 कर्ज थकबाकीदारांविरुध्द गुन्हा दाखल

0

भुसावळ । येथील विठ्ठल रुखमाई अर्बन को.ऑप. सोसायटीतर्फे कर्जदारांना कर्जपुरवठा करुन त्याची परतफेड न केल्यामुळे न्यायालयाच्या आदेशान्वये कर्जदार व जामिनदार अशा 10 जणांविरुध्द रजनी परदेशी यांच्या फिर्यादीवरुन बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 31 सप्टेंबर 2009 मध्ये विठ्ठल रुखमाई पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेत काही कर्जदारांना कर्ज देेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. यानुसार ज्ञानेश्‍वर सुदाम बढे, आनंदा माधव फेगडे आणि दिवाकर फेगडे (सर्व रा. महेश नगर) यांना 1 लाख 50 हजार कर्ज 5 वर्षांच्या मुदतीवर दिले हेाते.

न्यायालयाच्या आदेशान्वये करण्यात आली नोंद
यात आजपर्यंत 6 लाख 19 हजार 944 रुपयांची थकबाकी आहे तर कृष्णा त्र्यंबक ढाके, त्र्यंबक ढाके, सचिन कृष्णा ढाके (सर्व रा. वराडसिम) यांना 3 लाख रुपयांचे कर्ज 5 वर्षांच्या मुदतीसाठी देण्यात आले होते. याची रक्कम 5 लाख 65 हजार 565 इतकी थकबाकी आहे.

शालिग्राम तुकाराम सरोदे, श्रावण खंडू कोळी, उषा शालिग्राम भारंबे (सर्व रा. तापी नगर) यांना 2 जून 2005 रोजी झालेल्या पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेत 1 लाख 25 हजार रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. आजपर्यंत ही रक्कम 2 लाख 55 हजार 85 रुपये थकबाकी आहे. ज्ञानदेव भागवत सरोदे, आशा ज्ञानदेव सरोदे (रा. तळवेल) यांना 50 हजार रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. आजपर्यंत याची थकबाकी 87 हजार 242 इतकी आहे. वरील कर्जदारांनी घेतलेल्या रकमेची परतफेड न केल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास पीएसआय सुरळकर हे करीत आहे.