शेंदुर्णी । गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर 2016 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देश वासीयांना चलनातील 500 व 1000 रुपयाच्या नोटा बाद करुन धक्का दिला त्यामुळे नागरिकांना आजही अनेक प्रकारे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातुन नागरिक सावरलेले नाही. कारण 4 महिने झाले आहेत तरीही मानाजोगे व्यवहार हाताळणी करण्यासाठी अजूनही नोटा उपलब्द होत नसताना चलनात असणार्या नोटा व नाणी या विषयी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केले जात आहेत. त्यामुळे कारण नसतांना सरकारी चालनावरील विश्वास उठल्यासारखी परिस्थिती ग्रामीण व शहरी भागात निर्माण झाली आहे. त्यातच सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या 10 रुपयाच्या नाणे यांच्या संदर्भात विषयी संभ्रम निर्माण झाल्याचे दिसत आहे.
10 चे नाणे वापरातून बाद होतांना दिसत आहे. कारण कुठलाही सरकारी आदेश नसतांना हे चलन नागरिक व व्यावसायिक व्यवहार करताना तर बँकाही भरण्यात स्विकारत नसल्याने ग्रामीण व शहरातील लाखों रुपयाचे 10चे डॉलर पडून असुन स्वीकारणे व नाकारण्याचे कारणाने त्यावरून रोजच बाजार पेठेत वाद निर्माण होत आहेत. तरी रिजर्व बँक ऑफ इंडिया, राष्ट्रीयकृत बँका व केंद्र सरकारने यावर त्वरित स्पष्टीकरण देऊन संभ्रम दूर करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असताना असे कुठलेही प्रयत्न सरकारी पातळीवर होत नसल्याने नागरिकांच्या शंकांना खतपाणी मिळत आहे. तरी ही परिस्थिती लक्षात घेऊन रिजर्व बँकेने उपाय योजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.