10 पाड्यांवरील पाणीटंचाई मनसेच्या प्रयत्नांमुळे दूर

0

शहादा। तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत कन्साई अंतर्गत येणार्‍या 10 पाड्यांवरील पाणीटंचाई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रयत्नांमुळे दूर झली आहे. या गावातील जनता भीषण पाणीटंचाईपासून मुक्त झाल्याची माहिती मनसेचे नंदुरबार जिल्ह्याचे सचिव मनलेश जायस्वाल यांनी दिली. दि.28/12/2015 त्यानंतर 30/01/2017 रोजी जिल्हाधिकारी व कार्यकारी अधिकारी यांना शहादा तालुक्यातील डेमच्यापाडा, मेंढ्यावळ, केवडीपानी, धजापाणी, अंबापानी, मिठापुर या पाड्यांवरील पाणी टंचाई दूर करण्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदन देण्यात आले होते. परंतु त्यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. जिल्हाधिकारी, कार्यकारी अधिकारी जि.प.नंदुरबार, गटविकास अधिकारी शहादा पंचायत समिती शहादा यांना निवेदन देण्यात आले कि वरील पाड्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई त्वरित दूर करा अन्यथा दि.06/03/2017 रोजी शहादा तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयासमोर कायदेशीर आंदोलन केले जाईल असे सूचित केले होते.

गावामध्ये पाणीटंचाई दूर झाली
जुनी लीम्बर्दी येथे एक हातपंप, मेंध्यावळ येथे एक हातपंप, केवदिपानी येथे तीन हातपंप, आंबापानी येथे दोन हातपंप, कन्साई गावठाण येथे एक बोरवेल, सातपिम्प्री एक हातपंप, रातनपूर येथे एक हातपंप, मीठापूर येथे एक हातपंप बसविण्यात आलेले आहेत तर आंबापाणी येथे पाणी लागले नाही.केवडीपाणी येथे पाच टक्के पेसा निधीतून बोरवेल करण्यात आले.त्याबोअरवेल मधून विनामोटर दोनइंची पाणी उपसा होत आहे .यामुळे या गावामध्ये पाणीटंचाई दूर झाली आहे .याकामी गट विकास अधिकारी श्रीराम कांगणे, सरपंचा प्रभाकर ठाकरे, ग्रामसेवक माधवराव धनगर यांचे सहकार्य लाभले.पाणी टंचाई दूर होण्यासाठी केलेल्या आंदोलनात मनसे जिल्हासचिव मनलेश जायसवाल, ग्रा.प. सदस्य संभीबाई भिल, जोतीबाई तडवी, राज्या भिल, दिलीप पवार, दारासिंग भिल, किरण खर्डे, गण्या पटले, रामसिंग पाडावी, कुवरसिंग वडवी, लिंबा पाडावी, कांतीलाल पावरा,फत्तेसिंग भिल यांनी परिश्रम घेतले होते.या सर्व पाड्यातील पाणी टंचाई दूर झाल्याबद्दल मनसेचे गावक-यांनी आभार व्यक्त केलेत.