नवी दिल्ली – कमी पैशात जास्तीत जास्त नफा कसा मिळेल किंवा कमी पैशांच्या गुंतवणुकीत आपणास भरगोस परतावा कोठून मिळेल, याचा नेहमीच आपण शोध घेत असतो. त्यामुळेच, खासगी बँकच्या योजना, फायनान्स कंपनीच्या योजना, एलआयसीच्या योजना आणि पोस्टाच्या योजनांकडे आपले सातत्याने लक्ष असते. आता, पोस्टाने अशीच एक योजना ग्राहकांसाठी आणली आहे. त्यानुसार, केवळ 10 रुपयांत पोस्टात खाते उघडले जाऊ शकते.
पोस्ट खात्यात 5 वर्षीय पोस्ट ऑफिस डिपॉजीट अकाऊंट (आरडी) काढून आपणास हे खाते उघडण्यात येईल. आपल्या जवळच्या पोस्ट कार्यालयात हे खाते खोलता येईल. केवळ 10 रुपये भरुन हे खाते उघडण्यात येऊ शकते. या खात्यावर ग्राहकांना 6.9 टक्के व्याज मिळणार आहे. जे व्याज बँकमधून मिळणाऱ्या बचत खात्यापेक्षा अधिक आहे. सध्या, बँकांमधील बचत खात्यांवर 3.5 ते 6 टक्के (सर्वाधिक) व्याज मिळते. दरम्यान, या खात्यासाठी तुम्ही ज्वॉईंट पद्धतीनेही खाते खोलू शकता.