10 लाखांच्या खंडणीचा कट; सुत्रधार मानवतकर अटकेत

0

वर्धा । पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या नावे 10 लाखांच्या खंडणीच्या कटातील टायपिस्ट महेश सावंतचा साथीदार व मास्टरमाईंड मनोज मानवटकरला वर्धा जिल्ह्यातील पुलाई येथून सापळा रचून अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक निर्मलादेवी व अपर पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली खरंगनाचे ठाणेदार प्रशांत पांडे व मलाबार हिल पोलिसांनी ही कारवाई केली.

न्यायालयाच्या परवानगीने त्याला मुंबई पोलीस ताब्यात घेतील. आरोपीने गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर गाडीसुध्दा जप्त करण्यात आली आहे. चांदूर रेल्वे येथील गजानन खंदारने भीकूजी महाराज संस्थान परिसराचा रेती घाट लिलावात घेतला होता. नंतर खन्दारला कदम यांच्या कार्यालयातील टायपिस्ट महेश सावंत फोन करून दोन महिन्यांपासून पैसे मागत होता. 10 लाख द्यो अन्यथा मंत्रालयामार्फत कारवाई करायला लावू अशी धमकी तो देत होता. यापुर्वी मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.