मुंबई । इंडियन प्रीमियर लीग सुरू झाल्यापासून सदस्य असलेल्या मुंबई इंडियन्सने दहावर्षांच्या पूर्ततेचा सोहळा आयोजित केला.
यावेळी नीता अंबानी यांनी मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक सचिन तेंडुलकरसह, हरभजनसिंग, लसिथ मलिंगा या दिग्गज खेळाडूंचा सन्मान केला. यावेळी रिलायन्स उद्योगसमूहाचे मुकेश अंबानी यांच्या उपस्थितीत या 10 वर्षांच्या वाटचालीवर प्रकाश टाकणारे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले.