10 वर्षांनी भारताचे पाकशी क्रिकेटयुध्द

0

लंडन । भारत आणि पाकिस्तानदरम्यान रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल खेळली जाणार आहे. आकडेवारीनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीपासून ते वर्ल्ड टी-20 आणि वर्ल्डकपपर्यंत पाकविरुद्ध भारताचा नेहमीच विजय झालेला आहे. आयसीसीच्या या तीन सर्वांत मोठ्या सामन्यांमध्ये खेळण्यात आलेल्या 15 सामन्यांपैकी भारताने 13 सामन्यांत पाकचा धुव्वा उडवला आहे. तथापि, 2 सामने पाकिस्तानने जिंकलेले आहेत. तर रविवारचा सामना हा 10 वर्षांनी भारत-पाक फायनलमध्ये आमनेसामने येणार आहेत.

जाहिरातीचे दर 10 पट वाढले
लंडनच्या ओव्हलमध्ये रविवारी भारत-पाकिस्तान संघांदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीची महाफायनल होणार आहे. याचे थेट प्रेक्षपण करणार्‍या स्टार स्पोर्टसने आपल्या सर्व चॅनल्सवरील जाहिरातींचे दर 10 पट वाढवले आहेत. 30 सेकंदांच्या जाहिरातीसाठी 1 कोटी रुपये घेतले जात आहेत.

1992 मध्ये पहिला विजय
भारताने पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये सर्वात पहिल्यांदा 1992 मध्ये हरवले होते. . प्रत्युत्तरात पाकिस्तानी टीम 176 धावांवर ऑलआऊट झाली होती. या विजयाचा हीरो होता सचिन तेंडुलकर. भारत आणि पाकिस्तानदरम्यान होणार्‍या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अगोदर टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने विराट कोहलीला सल्ला दिला आहे. टीम इंडियाने संघात कुठलाही बदल न करता उतरले पाहिजे. द्रविड म्हणाला, मला असे वाटते की विराटने त्याच्या मनासारखीच रणनीती ठेवावी. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आपण पाहिलेच आहे की भारताला धावांचा पाठलाग करणे फायद्याचे आहे. संघात खूप अनुभवी खेळाडू आहेत जे कठीण परिस्थितीत संघाला उभारी देऊ शकतात. म्हणूनच विराटने सध्याच्या संघात कुठलाही बदल करणे टाळले पाहीजे. राहुल पुढे म्हणाला, लोक तर प्रश्न करतीलच की पहिल्या 10 ओव्हरमध्ये तुम्ही 4.8 सरासरीने धावा का केल्या? परंतु आपल्याला माहिती आहे की रोहित आणि शिखरने इनिंग कशी खेळली. आपल्याजवळ हार्दिक पंड्या, धोनी, युवराज, केदार जाधव आणि जडेजासारखे असे खेळाडू आहेत जे आपल्या आक्रमक फलंदाजीने कुठल्याही क्षण सामन्यात फेरबदल करू शकतात.