10 वीची पुस्तके मार्चमध्येच द्या

0

मुंबई । दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षात नवा अभ्यासक्रम असणार असून त्यामुळे बदलेली दहावीची पुस्तके मार्च 2018 मध्येच उपलब्ध करुन द्यावीत असे मुख्याध्यापक संघटनेने म्हटले आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार एकेका इयत्तांच्या अभ्यासक्रमात बदल होत असून यंदा सातवी आणि नववीचा अभ्यासक्रम बदलला आहे. तर येत्या शैक्षणिक वर्षात दहावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. त्यामुळे पुस्तके लवकर मिळावीत म्हणून मुख्याध्यापक संघटना आक्रमक झाली आहे.

सीबीएसई बोर्डाशी तुलना
दहावीची पुस्तके मार्च 2018 अखेर बाजारात उपलब्ध केल्यानंतर शिक्षकांचे प्रशिक्षण एप्रिल मध्ये करावे. जून महिन्यात नको असेही मुख्याध्यापकांनी राज्य शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय सचिव वाय. सी. चांदेकर यांना निवेदन देवून मागणी केली आहे. सीबीएसई व अन्य बोर्डात 80+20( तोंडी) चे प्रमाण असताना महाराष्ट्रात लेखी 100 का? याचा अर्थ बोर्डाच्या शाळांच्या पालकांना अन्य बोर्डाकडे वळविण्यास मंडळच प्रवृत्त करत असून हा राज्यातून एसएससी बोर्ड संपविण्याचा डाव असल्याची टिकाही यावेळी करण्यात आली. या शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष शंकर पवार, प्रशांत रेडीज, रमेश ठाकरे, जयसिंग कदम सहभागी होते.