यावलच्या गस्ती पथकाला पाहताच सागवान चोर पसार
यावल- हरीरपुरा येथे निंबादेवी धरणाकडे कच्च्या रस्त्याने काही संशयीत सागवान लाकडाची वाहतूक करणारी असल्याची गुप्त माहिती यावल वनविभागाच्या गस्ती पथकाला मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचला मात्र पथक आल्याची चाहूल लागताच संशयीत लाकडासह सायकल टाकून पसार झाले. सागवानी लाकडाचे 12 नग तसेच सायकल मिळून दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्या पथकाने केली कारवाई
धुळे विभागीय वन अधिकारी उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल गस्ती पथकाचे वनक्षेत्रपाल एस.आर.पाटील, वनपाल सुनील आर.पाटील, वनरक्षक रवींद्र बी.पवार, वाहन चालक भरत बी.बाविस्कर, पोलिस कॉन्स्टेबल सचिन तडवी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.