१० गोष्टी रोचक तथ्य – अवेन्जर्स एंड गेम का बघावा

0

“अवेन्जर्स एंडगेम’ येत्या २६ एप्रिलला भारतासह जगभरात प्रदर्शित होत आहे. अवेन्जर्स कडीतल्या दुसऱ्या आणि शेवटच्या भागाला बघण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अवघ्या चार तासात युट्युबवर एक मिलियन लाईक मिळवण्याचा मान ह्या चित्रपटाच्या ट्रेलरला मिळाला आहे. अवघ्या दोन दिवसांवर ह्या चित्रपटाचा प्रदर्शन आलं आहे, त्यामुळे हा चित्रपट का बघावा आणि ह्याचित्रपटा संदर्भातील काही रंजक गोष्टी आपण बघुयात…

१. “”कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा?” हे उत्तर जाणून घेण्यासाठी ज्याप्रमाणे दर्शकांनी राजामौलीच्या बाहुबली-२ ला अफाट गर्दी केली होती, त्याचप्रमाणे दिग्दर्शक जोडी एन्थोनी आणि जो रुसोच्या अवेन्जर्स एंडगेम मघ्ये सुद्धा “थानोस’ चा खात्मा कोण करणार? हे बघण्यासाठी दर्शक चित्रपटगृहात प्रचंड गर्दी करतील, ह्यात तिळमात्र शंका नाही.

२. मार्वल सिनेमाचा हा २२ वा चित्रपट आहे, ज्याची अडवान्स बुकिंग फक्त सहा तासात विकली गेली आहे. तीन तास आणि दोन मिनिटांचा अर्थात १८२ मिनिटांचा हा चित्रपट मार्वल सिनेमाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट आहे.

३. अमेरिकेच्या जॉर्जिया भागात शुटींग सुरु असतांना “इर्मा’ चक्रीवादळामुळे ह्या चित्रपटाच चित्रीकरण काही दिवसांसाठी थांबलं होत, ज्यामुळे हा चित्रपट तब्बल एक महिना लांबला.

४. चित्रपटाला “एंडगेम’ हेच नाव का ठेवलं? हा प्रश्न जेव्हा दिग्दर्शकाला विचारला गेला तेव्हा त्यांनी उत्तर दिल की, बुद्धिबळमध्ये जेव्हा मोजकेच खेळाडू शिल्लक असतात तेव्हा त्याला एंडगेम अस म्हणतात. अगदी असच ह्या सिनेमातदेखील मोजकेच अवेन्जर्स आणि अर्धी जनसंख्या शिल्लक आहे, त्यामुळे चित्रपटाला हे नाव देण्यात आले.

५. मार्वलच्या इतिहासात कधीही न झाले ते ह्या सिनेमात होणार आहे, अर्थात हा चित्रपट खूप भावूक आणि बांधून ठेवणारा असणार आहे. चित्रपटगृहात टिश्यू पेपर सोबत ठेवण्याचा सल्ला चित्रपटाच्या एका मुख्य नायकाने – क्रिस हेम्स्वर्थ (थोर) ने प्रेक्षकांना दिला आहे.

६. ह्या चित्रपटात “कॅप्टन मार्वेल’ “एंटमैन’ आणि “क्विकसिल्वर’ची देखील दमदार एन्ट्री होणार आहे, त्याचसोबत मागच्या चित्रपटात पूर्णपणे फ्लॉप ठरलेल्या “हल्क’ ची देखील जोरदार भूमिका असणार आहे. तर थानोस दोन धारी तलवार घेऊन खलनायकी करणार आहे.

७. मार्क रुफाल्लो म्हणजे लोकप्रिय “हल्क’ ने घोषित केलं आहे की ह्या चित्रपटात हल्क म्हणून त्याची शेवटची कारकीर्द असणार आहे. ह्यानंतर तो कधीही हल्कच्या भूमिकेत दिसणार नाहीये. त्यामुळे देखील त्याला हल्कच्या रुपात बघण्याची ही अंतिम वेळ प्रेक्षक गमावणार नाही हे नक्की.

८. ह्या चित्रपटात अवेन्जर्स टीम एका नव्या वेशभूषेत दिसणार आहे, क्रीम आणि तपकिरी रंगाच्या सुटमध्ये टीम वावरणार आहे तसेच हॉकआय देखील नव्या केशरचनेत प्रेक्षकांना दिसणार आहे.

९. हा चित्रपट उत्तर भारतात १२२० स्क्रीनवर, आंध्र-तेलंगानात ४००, तमिळनाडूत ५००+ आणि इतर राज्यात ६००+ स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे. एटोम बुकिंगच्या आकडेवारीनुसार भारतात पहिल्या दिवसाची बुकिंग ही ९५% झाली असून आतापर्यंत चित्रपटाचा ४० कोटी गल्ला झाला आहे तसेच चित्रपटाचे जागतिक वितरण हक्क २१०० कोटींच्या घरात विकले गेले आहे. भारतात हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलगु भाषेत रिलीज होत आहे.

१०. अवेन्जर्सचा दहा वर्षाचा प्रवास येत्या २६ एप्रिलला संपणार आहे. त्यानंतर मार्वल पुन्हा आयरन मैन कडे वळणार आहे. त्यासाठी मार्वलने रोबर्ट डावनी ज्यू. ला पुन्हा दहा वर्षांसाठी करारबद्ध केलं आहे. अवेन्जर्ससाठी बनवलेली ए. आर. रहमानची धून जरी फ्लॉप ठरली असली, तरी चित्रपट मात्र बाहुबली सिद्ध होणार हे नक्की…

पुढच्या भाग मध्ये आपण ह्या चित्रपटाची समीक्षा पाहू…

– पुनीत शर्मा