भाजपा ‘जय श्री राम’ लिहलेले 10 लाख पत्र ममता बॅनर्जींना पाठविणार

0

नवी दिल्ली: नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा पश्चिम बंगालमधील राजकारणाची झाली. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळाला. हा संघर्ष अगदी टोकाला देखील गेला. दरम्यान आता पश्चिम बंगालमध्ये ‘जय श्री राम’ ह्या घोषणांमुळे राजकीय वातावरण तापत आहे. ‘जय श्री राम’च्या घोषणा देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर मुख्यमंत्री ममता बनर्जी भडकल्या असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात पसरला आहे. त्यांनतर भाजपच्या 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आले होते. त्याला उत्तर देत भाजपकडून ‘जय श्री राम’ लिहलेले 10 लाख पत्र ममतांना पाठवले जाणार असून त्याची तयारी सुरु झाली असल्याची माहिती भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी दिली.

पश्चिम बंगालच्या चंद्रकोण येथून ममता यांचा ताफा जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या होत्या. या घोषणा ऐकताच ममतांनी गाडी थांबवली. त्या गाडीतून उतरून बाहेर आल्या आणि ही घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर भडकल्या होत्या. यावेळी पोलिसांनी भाजपचे 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर भाजप ही आता आक्रमक झाली असून ममता बनर्जी यांना 10 लाख ‘जय श्री राम’ लिहलेले पत्र पाठवणार आहे. त्याची तयारी सुद्धा झाली असल्याचा खुलासा अर्जुन सिंह यांनी केला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या म्हणून ममता बनर्जी ह्या पोलिसांचा उपयोग करून त्यांना अटक करत असतील तर त्यांना ‘जय श्रीराम’ लिहलेले पत्र पाठवू उत्तर दिले जाणार आहे. ममता बनर्जी यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे दिसतय. असे म्हणत खासदार अर्जुन सिंह यांनी ममतांवर टीका केली.