नवी दिल्ली: सिक्कीममधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटच्या दहा आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा, जनरल सेक्रेटरी राम माधव यांच्या उपस्थिती या आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. सिक्कीममध्ये सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट अनेक वर्षापासून सत्तेत होती. पवन कुमार चामलिंग हे या पक्षाचे प्रमुख आहेत. चामलिंग हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आहे.