१० टक्के आरक्षणाचा विधेयक आज राज्यसभेत ; सरकारसमोर बहुमताचे आव्हान

0

नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या मागास सवर्ण घटकाला शिक्षण व शासकीय नोकरीत १० टक्के आरक्षण देण्यासाठी मोदी सरकारने काल लोकसभेत मांडलेले घटनादुरुस्ती विधेयक (१२४ वी घटनादुरुस्ती)३२३ विरुद्ध ३ अशा बहुमताने मंजूर करण्यात आले. हे विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार आहे. यासाठी राज्यसभेच्या अधिवेशनाचा कालावधीही एक दिवसांनी वाढवला आहे.

राज्यसभेत भाजपचे बहुमत नसल्याने सरकारची कसोटी लागणार आहे. राज्यसभेत खासदारांची संख्या २४४ आहे. विधेयक मंजूर होण्यासाठी यांपैकी दोन तृतीयांश म्हणजे १६३ मते आवश्यक आहेत. एनडीएचे ९८ खासदार आहेत. या विधेयकाला लोकसभेत पाठिंबा देण्याऱ्या विरोधी पक्षाचे १७२ खासदार आहेत. त्यामुळे हे विधेयक मंजूर होण्यास काही अडथळा येणार नाही. या विधेयकाला विरोध केल्यास येत्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाला रोषाचा सामना करावा लागेल.