विरोधकांच्या गदारोळात आरक्षण विधेयक राज्यसभेत सादर

0

नवी दिल्ली- सवर्ण घटकाला आर्थिक बाबीवर १० टक्के आरक्षण देण्यासाठी विधेयक लोकसभेत पारित करण्यात आला आहे. हा विधेयक आज राज्यसभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. त्यासाठी संसदेच्या अधिवेशनाचा कालावधी एका दिवसासाठी वाढविण्यात आला आहे. दरम्यान आज हे विधेयक राज्यसभेत ठेवण्यात आले आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी गदारोळात हा विधेयक राज्यसभेत ठेवला आहे.

विरोधकांनी नागरिकता संशोधन विधेयकावरून गदारोळ केले. त्यामुळे कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. आरक्षण विधेयक लोकसभेत पास झाले असून राज्यसभेत भाजपचे बहुमत नसल्याने राज्यसभेत हे विधेयक पास करणे आव्हानात्मक ठरणार आहे.