स्मृती इराणी यांच्या मुलीला सीबीएसईत ८२ टक्के गुण !

0

नवी दिल्ली: आज दहावी सीबीएसईचा निकाल जाहीर झाला. यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीला ८२ टक्के गुण मिळाले आहे. खुद्द स्मृती इराणी यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली. झोईस असे त्यांच्या मुलीचे नाव आहे. मागील आठवड्यात जाहीर झालेल्या १२ वीच्या निकालात त्यांच्यामुलाला ९४ टक्के गुण मिळाले होते.

आज अमेठीत लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे. स्मृती इराणी येथून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढत आहे. आज मतदान होते, त्यातच त्यांच्या मुलीचा निकाल लागला. मतदानाच्या व्यस्ततेतून वेळ काढून त्यांनी मुलीला शुभेच्छा दिल्या.