दहावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर; निकाल घसरला

0

पुणे-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी फेरपरीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यंदा दहावी फेरपरीक्षेचा निकाल 23.66 टक्के लागला आहे. गेल्यावर्षी 24.44 टक्के निकाल लागला होता. बारावी फेरपरिक्षेप्रमाणेच दहावीचा निकाल घसरला आहे.

१७ जुलै ते दोन ऑगस्ट दरम्यान दहावीची फेरपरिक्षा घेण्यात आली होती. दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून महिनाभरातच फेरपरिक्षा घेण्यात आली होती. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ मंडळांमार्फत जुलै २०१८ मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.

फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सप्टेंबरपासून पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. तर पेरपरिक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेल्यांना मार्चमध्ये पुन्हा परीक्षा देता येणार आहे.