नवी दिल्ली । जे भारतीय सैनिक श्रीनगर व सिमा भागात रात्रदिवस गस्त घालून आपले व देशाचे रक्षण करतात त्या भारतीय जवानांला श्रीनगर येथे रस्त्यावर जात असतांना काही जण चापटा मारतांना दिसत आहे.तर काहीजण त्याचे चित्रीकरण करतांना दिसत आहे. भारतीय जवानांना मारलेल्या प्रत्येक चापटेच्या बदल्यात 100 जिहादीना ठार मारा , या व्हिडिओवर अशी अत्यंत तिखट प्रतिक्रिया भारतीय संघाचा फलंदाज व केकेआरचा कर्णधार गौतम गंभीर ट्विट करून
दिली आहे.
गंभीर सैनिकांना मारल्यावर संतापला
काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या जवानांना जमावाकडून मारहाण होत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर संतापलेल्या गौतम गंभीरने ट्विटकरुन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.ज्यांना आझादी हवी आहे त्यांनी आताच देश सोडून चालते व्हा. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे अशा गंभीरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानावेळी श्रीनगरमध्ये जोरदार हिंसाचार झाला होता. या व्हिडीओत हे जवान मतदान केंद्रावरुन परतत असल्याचे दिसत आहे. यावेळी हे जवान एव्हीएम घेऊन परतत असताना काही तरुण या जवानांवर हल्ला करत हाताने, पायाने मारहाण करत आहेत. तसेच यावेळी भारत विरोधात घोषणाही दिल्या जात असल्याचे ऐकू येत आहे. एका तरुणाने तर जवानाचे हेल्मेटही फेकून दिले असल्याचे स्पष्ट दिसत आहे.तर एका तरूणाजवळ पोलिसांजवळ असलेली ढाल सुध्दा दिसत आहे.तर हे जवान ज्या रस्त्याने जात आहे.त्या रस्त्याच्या कडेला नागरिकांनी दुतर्फा नागरिकांनी गर्दी दिसत आहे. तर काहीजण याचे चित्रीकरण करतांना दिसत आहे.जवानांना मारणार्यामध्ये लहान तसेच युवा सुध्दा सहभागी झालेले दिसत आहे. असे घडूनही भारतीय जवान शांतेत आपला मार्गक्रमण करित होते.एवढी शांतते मार्गक्रमण करणार्या या सेनेच्या जवानाना मारूनही ते गो बॅक इडियाचे नारे देत होते.
लष्कराची बाजु धरली
मागच्या महिन्यातही गौतम गंभीरने भारतीय लष्कराची बाजू उचलून धरली होती. पण यावेळी त्याने दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थीनी गुरमैहर कौरचाही बचाव केला होता. भारतीय संघात सलामीवीराचा भूमिका बजावणारा गौतम गंभीर सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार आहे. श्रीनगरमध्ये रस्त्यावर शांतपणे चालत असलेल्या सीआरपीएफच्या जवानांना छेडतानाचा तसंच मारहाण करत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये जवानांना मिळणारी वागणूक पाहता भारतीयांचं रक्त उसळल्याशिवाय राहणार नाही.