मुंबई । रिओ, ब्राझिल येथे झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत रोइंग प्रकारात अंतिम फेरीपर्यंत नाशिक जिल्ह्यातील दत्तू भोकनळ याने मजल मारली होती. आता त्याचे लक्ष अमेरिकेत होणार्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी जय्यत तयारी करत आहे. असे असले तरी तो आणखी एक तयारी करित आहे,100 मीटर धावण्याच्या शर्यतीची तयारी करित आहे. योग्य शरीरयष्टी लाभलेला दत्तू 100 मीटर धावण्याच्या क्रीडाप्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा बाळगून आहे. या नव्या आव्हानाविषयी दत्तू भोकनळ म्हणाला की, रोइंगमध्ये तर कामगिरी करत राहण्याचा माझा इरादा आहेच, रोइंग खेळासाठी वॉर्मअप करत असताना मी 100 मीटर धावण्याच्या शर्यतीतही खेळू शकतो असा विश्वास वाटू लागला. त्यामुळे त्याची तयारीही सोबतीने सुरू आहे. आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही मी भाग घेण्याची इच्छा आहे.धावण्याच्या या जगातील सर्वमान्य खेळासाठी आपण योग्य ती वेळ देऊ शकतो, असा विश्वासही दत्तूला वाटतो आहे.
रोइंग खेळ सामान्यांना परवडणारा नाही
आगामी काळात धावपटू म्हणूनही दत्तू ट्रॅकवर दिसला तर आश्चर्य वाटायला नको. रिओ ऑलिम्पिकमध्ये चमकलेला दत्तू सध्या अमेरिकेतील जागतिक अजिंक्यपद रोइंगसाठी तयारी करतो आहे. त्यासाठी पुण्यात त्याचा सराव सुरू असून सप्टेंबमधील या स्पर्धेच्या आधी काही दिवस अमेरिकेत तो वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी जाणार आहे.या खेळातील त्याच्या सहभागानंतर रोइंगला जी प्रसिद्धी मिळाली त्यामुळे राष्ट्रीय रोइंग स्पर्धांमध्ये खेळाडूंची संख्या वाढल्याचे तो म्हणतो. रोइंग या खेळाची आता माहिती उदयोन्मुख खेळाडूंना होऊ लागली आहे. राष्ट्रीय स्पर्धेत नेहमी 150 पर्यंत खेळाडू सहभागी होतात यावेळी हा आकडा तिपटीने वाढल्याचे तो म्हणतो. रोइंग हा खेळ मात्र सर्वसामान्यांना परवडणारा नाही. सेनादलात आज नोकरीस असल्यामुळे आपल्याला सर्वप्रकारचे सहकार्य मिळते आहे.