चिंचवड – संजय गांधी निराधार योजना समिती चिंचवड विधानसभा, अप्पर तहसील कार्यालय पिंपरी-चिंचवड, मुळशी तहसील कार्यालय, अन्नधान्य वितरण विभाग, रतन गॅस एजन्सी, आमदार लक्ष्मण जगताप मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने अंध, अपंग, मुकबधीर, कर्णबधीर, विधवा व घटस्फोटित महिला, मुलगा नसलेले ज्येष्ठ नागरिक व मागासवर्गातील नागरिकांना 100 रुपयांत गॅस कनेक्शन देण्यासाठी शनिवारी 22 आणि रविवारी 23 फेबु्रवारी रोजी थेरगाव येथील अनुसया मंगल कार्यालयात शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराला रहाटणी, सांगवी, पिंपरी, आकुर्डी, चिंचवड, देहूरोडचे तलाठी तसेच मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, महा ई-सेवा केंद्र आणि अन्नधान्य वितरण अधिकारी उपस्थित राहणार आहेत. आवश्यकता कागदपत्रे जागेवरच मिळावीत यासाठी या शिबीराच्या माध्यमातून एकाच ठिकाणी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिबीराचा लाभ घेऊ इच्छिणार्यांनी अधिक माहितीसाठी अदिती (9762353637), माने (9309773982), मळेकर (9822646130) यांच्याशी संपर्क साधावा.