नवी दिल्ली । सनरायझर्स हैदराबादच्या आशिष नेहराने एक नवा विक्रम केला आहे. त्याने बँगलोरच्या शेन वॉट्सन आणि श्रीनाथ अरविंदला बाद करत दोन विकेट घेतल्या. यासोबत आयपीएलमध्ये 100 विकेट घेणारा पहिला डाव्या हाताचा गोलंदाज बनण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला.
83 सामन्यांमध्ये नेहराने हा विक्रम आपल्या नावे केला. या सामन्यात नेहराने 4 षटकात 42 धावा देऊन 2 विकेट घेतल्या. 2008 पासून नेहरा आयपीएलमध्ये खेळत आहे. पहिल्या आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळला होता. त्यानंतर त्याला दिल्ली डेअर डेव्हिल्सने विकत घेतलं. चौथ्या सत्रात तो पुणे वॉरिअर्सने विकत घेतलं होतं पण जखमी झाल्यामुळे तो पूर्ण सत्रात खेळू शकला नाही. दोन सत्रांनंतर तो पुन्हा दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळायला लागला. त्यानंतर 2014 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने त्यांना 2 कोटी रूपयांना विकत घेतले. सीएसकेच्या संघावर बंदी आल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाने नेहराला साडे पाच कोटी रूपयांत विकत घेतलं. नेहरा आतापर्यंत एकूण 5 संघांकडून खेळला आहे.