100 व्या ऑनलाईन लोकशाही दिनास प्रतिसाद

0

मुंबई । मंत्रालयात आज झालेल्या 100 व्या ऑनलाईन लोकशाही दिनात विविध विभागांशी संबंधित 18 तक्रारींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ निर्णय घेतले.

आजपर्यंतच्या लोकशाही दिनात 1390 तक्रारींपैकी 1383 तक्रारींवर निर्णय घेण्यात आला आहे. या लोकशाही दिनास सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू, पोलिस महासंचालक सतीश माथूर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव एस. जे. कुंटे, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगरविकास (1) प्रधान सचिव नितीन करीर, नगरविकास (2) प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, गृह विभागाचे प्रधान सचिव रजनीश सेठ, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय सेठी व अधिकारी उपस्थित होते.