शंभर कोटी रुपये हरले शंभर कोटी जनता जिंकली-मुंडे

0

मुंबई-बहुमत नसल्यामुळे तीन दिवसातच कर्नाटकातील भाजपा सरकार कोसळले असून बी.एस.येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. बहुमतासाठी भाजपने घोडेबाजार भरवला. आमदार फोडण्यासाठी त्यांना १०० कोटी रुपये देण्याचे देखील आश्वासन देण्यात आले मात्र भाजपच्या अमिषाला कोणीही बळी पडले नाही. त्यामुळे शंभर कोटी रुपये हरले असून शंभर कोटी लोकांचा विजय झाला आहे असे ट्वीट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.