विमान कोसळल्याने शंभराहून अधिक जणांचा मृत्यू

0

हवाना :- क्युबामध्ये बोईंग ७३७ प्रवाशी विमान कोसळल्याने शंभराहून अधिक प्रवाश्यांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. या विमानात जवळपास १०७ प्रवाशी होते. हवानाच्या मुख्य विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर काही क्षणातंच हे विमान कोसळले. क्युबाची अधिकृत वेबसाईट क्युबेडिबेटने यासंदर्भात वृत्त दिले आहे.


 

बोईंग ७३७ जेट हे विमान हवाना येथून होलगुइन या ठिकाणी जात होते. हवाना येथील मुख्य विमानतळावरुन टेक ऑफ केल्यानंतर जोस मार्ती इंटरनॅशनल एअरपोर्टच्या सँटियागो डी लास वेगस नामक शहराजवळ ही दुर्घटना झाली. विमान धावपट्टीच्या जवळच कोसळल्याने त्याने पेट घेतला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काळ्या धुराचे लोट पसरल्याबाबतचे काही छायाचित्रे सोशल मीडियातून झळकत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव दल घटनास्थळी दाखल झाले आहे.