105 तरुणांनी व्यसनमुक्तीसाठी घेतला सहभाग

0

खिर्डी । तांदलवाडी येथे सहा दिवसांपासून महाएकता फाउंडेशनतर्फे निवासी व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी शिबीराच समारोप करण्यात आला. शिबिरात 105 तरुण व्यसनमुक्त होण्यासाठी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार विजेते व गौधाम व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्राचे अध्यक्ष गुरुवर्य गौराम बिडवे (राजूर-नगर) यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमास माजी महसुल मंत्री आमदार एकनाथराव खडसे, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जि.प.सदस्य कैलास सरोदे, शिवाजी पाटील, राजू माळी, निवृत्ती पाटील, अनिता चौधरी, सरपंच श्रीकांत महाजन आदी उपस्थित होते. यशस्वितेसाठी महाएकता फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश्‍वर कोळी, उपाध्यक्ष अकिलभाई शेख, रमेश नमायते, गोकूळ चौधरी, रमेश चौधरी, लुकमान शाह आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे अध्यक्ष दत्तात्र्यय तायडे यांनी केले.

नवचैतन्यासाठी उपक्रम
निवासी शिबिरामध्ये तरुणांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व व्यसनांपासुन दूर राहण्यासाठी व्यसनमुक्ती पुरस्कार विजेते गुरुवर्य गौराम बिडवे (राजूर) अहमदनगर, शेतीतज्ञ व समाजसेवक रमाकांत डेरे, आदर्श सरपंच राष्ट्रपती पुरस्कार विजेते मनोज गाडे, शेखर पाटील व सखाराम भांडे या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगसाधना, ध्यान, सेवा, सत्संग, खेळ, किर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन व्यसनाधीन तरुण निव्यसनी व्हावे, त्यांच्या कुटुंबामध्ये नवचैतन्य निर्माण होण्यासाठी हा उपक्रम नि:स्वार्थीपणे पार पाडण्यात आला.

व्यसनापासून सुटका
वाढती बेरोजगारी, नोकरी अभावी ध्येय असलेल्या नैराश्य आणि परिणामी वाढत चाललेली व्यसनाधिनता यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे. दारु हे व्यसन व्यसनी लोकांच्या आयुष्याला लागलेली महाभयानक किडच आहे. अपूर्व आनंद मार्ग या शिबिराच्या माध्यमातून तरुणांना व्यसनमुक्तीचे धडे देण्यात येतात. आर्ट ऑफ लिव्हींगच्या माध्यमातून आतापर्यंत पंधरा हजारांहून अधिक जणांची व्यसनांपासून सुटका करण्याचे सामाजिक कार्य घडत आहे, असे प्रतिपादन गुरुवर्य गौराम बिडवे यांनी केले.