नवी दिल्ली-देशाला हदरवून सोडणाऱ्या दिल्लीतील बुराडी भागातील ११ जणांच्या मृत्यूचे गूढ वाढतच चालले आहे. रोज या प्रकरणात नवे खुलासे होताना दिसत आहेत. मृत परिवार दिल्लीला स्थानिक व्हायच्या आधी हरियाणातील टोहानामध्ये राहत होता, अशी माहिती समोर आली आहे. १९८७ मध्ये तेथील घर विकून ते दिल्लीमध्ये राहू लागले. काही महिन्यांपूर्वीच आपल्या जुन्या घरात असलेला गोलाकार जिना पहायला हे कुटंब आले होते. ते जिना पहायला का आले होते, हे मात्र समजू शकलेले नाही. या गोलाकार जिन्याला लटकून आत्महत्या करण्याची योजना होती, असा कयास आहे.
५-६ महिन्यांपूर्वी भाटिया कुटुंबाच्या सूना आणि नातवंडे यांनी टोहाना येथील घरातील गोलाकार जिन्याची पाहणी केली होती, अशी माहिती घराचे आत्ताचे मालक रामस्वरुप यांनी दिली. भाटिया कुटूंब अजिबात अंधश्रद्धाळू नव्हते. मात्र निरंकारी मिशनशी हे कुटूंब जोडले गेले होते, असे नातेवाईक राज भाटिया यांनी सांगितले आहे.
गुन्हे शाखेला भाटियांच्या घरातून आणि दुकानातून अनेक पुरावे होती लागले आहेत. भाटिया बंधूंचे प्लायवूड आणि किराणा मालाचे दुकान होते. तपासादरम्यान पोलिसांना एक पॉलीथिन आणि डायरीचे पान मिळाले आहे. दुकानाच्या वादावरुन तर या ११ जणांचा मृत्यू झाला नाही ना याचाही शोध पोलीस घेत आहेत.