11 रोजी शिक्षकांचे आंदोलन

0

भोसरी : लोककल्याण मजदूर युनियनच्यावतीने शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी 11 ऑक्टोबर रोजी एक दिवसाचे लाक्षणिक काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. विविध मागण्यांसाठी संगमेश्‍वर एज्युकेशन ट्रस्ट, सिद्धेश्‍वर हायस्कूलचे प्राचार्य यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले आहे. शासन नियमाप्रमाणे सर्व कर्मचार्‍यांना नेमणूक पत्र देणे आवश्यक आहे, दोन वर्षाच्या सेवेनंतर प्रत्येक कर्मचार्‍यास कायम करणे, शिक्षण विभागाचे मंजुरी घेणे, कर्मचार्‍यांना भविष्य निर्वाह निधी योजनेचा फायदा आणि लाभ घेणे, कर्मचार्‍यांच्या विविध दफ्तरी नोंदी करणे, नियमितपणे आणि दरसाल कायद्यानुसार वार्षिक वेतन वाढ देणे आदी बाबी करण्याचे बंधन तुमच्यावर होते आणि आहे. पण यापैकी कशाचीही पूर्तता केली नाही. त्यामुळे या संघटनेचे सभासद असून सध्या ही एकमेव कामगार संघटना त्याचे प्रतिनिधित्व करीत आहे