11 कोटींचा अपहार, प्रदीप नेहतेंना अटक

0

भुसावळ– विठ्ठल-रुखमाई सोसायटीतील 11 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी तब्बल 185 आरोपींविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तो जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी प्रदीप नेहते यास सोमवारी सायंकाळी जळगावच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पोलीस उपअधीक्षक लतीफ तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत, जीवन पाटील, जगताप आदींच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, या गुन्ह्यात तब्बल 185 आरोपी असून टप्प्या-टप्प्याने आरोपींना अटक करू, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.