11 गावांचा डीपीआर बनविण्यास मंजुरी!

0

पुणे । महापलिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या 11 गावाचा विकास आराखडा महापालिकेने करण्यास गुरुवारी झालेल्या मुख्याभेत एकामताने मान्यता देण्यात आली. त्यानुसार प्रशासनाकडून त्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने 5 ऑक्टोबर रोजी नवीन 11 गावाचा समावेश पालिकेत आहे. या गावांचा विकास आराखडा तयार करणे आवश्यक होते. शहर सुधारणा समितीने 11 गावांचा विकास आराखडा महापालिकेत करण्यात आला. याअगोदर पीएमआरडीने विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यामुळे गावांचा विकास आराखडा महापालिका करणार की पीएमआरडीए असा प्रश्‍न निर्माण झाला होता. गावांच्या विकास आराखड्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे.

सध्या 11 गावांमधील बांधकामांना विभागीय आराखड्यानुसार मान्यता देण्यात येत आहे. महापालिका प्रशासन आता विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करले. शहर सुधारणा समितीच्या प्रस्तावानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले, महापालिकेमध्ये समावेश झालेल्या गावांचा महसूल पालिकेला मिळत नाही. बांधकामांना रिजनल प्लॅननुसार परवानग्या देण्यात येत असून पालिकेचे नुकसान होत आहे.सर्वसाधारण सभेने विकास आराखडा तयार करण्यास मंजूरी दिल्यामुळे आता जागेवर जावून सर्व्हेक्षण करणे, आरक्षणे प्रस्तावित करणे, बांधकाम नियमावली करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.