11 जानेवारी रोजी बहूजन क्रांती मोर्चा

0

जळगाव : अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, ओबीसी, भटके- विमुक्त अल्पसंख्याक समुदायातर्फे सामाजिक न्यायाच्या मागणीसाठी 11 जानेवारी रोजी जळगाव येथे बहूजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बहूजन क्रांती मोर्चा बहूजन समाजाच्या घटनात्मक हक्क व अधिकारासाठी असून मानवतेची मूल्ये प्रतिष्ठित करण्यासाठी आहे. कोणत्याही जातीच्या विरोधात मोर्चा नसून बहूजन समाजाच्या एकजूटीच्या एल्गार करण्यासाठी हा मोर्चा आहे. ग्रामीण परिसरातील दलित, आदिवासी, ओबीसी, भटके विमूक्तासह अल्पसंख्याक समाजाने आपल्या हक्कांसाठी आणि सामाजिक न्यायासाठी बहुजन क्रांतीमोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन बहूजन क्रांती मोर्चाचे संयोजक मुकुंद सपकाळे यांनी केले आहे. कंडारी, उमाळा, कुसुंबा, चिंचोली, येथे दलित – आदिवासी समाजाच्या बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस दत्तु कोळी, संतोष सोनवणे, गोपाळ रिवाजकर, गोपाळ चिमणकर, विजय परदेशी, सूधाकर सोनवणे, युवराज झाल्टे, विशाल मराठे, हेमराज पवार, मधूकर सोनवणे, विलास भालेराव, प्रकाश लोखंडे, राजु रंधे, ईश्‍वर सपकाळे, वसंत सोनवणे, भिका भालेराव, समाधान सोनवणे, आनंदा रंधे, संजय ससाणे, आदी उपस्थित होते.