धुळे । येथे 5 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या सायकलींग स्पर्धेत जळगाव येथील चार सायकलपटूंनी 11 तासाच्या आत 200 किलोमीटरचा पल्ला गाठून रॉन्डेनियर किताब पटकावला. सदर बीआरएम स्पर्धा सायकलिस्ट क्लब यांनी आयोजित केली होती. या स्पर्धेत 27 सायकलपटूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये जळगावातून चार जण सहभागी झाले होते. या स्पर्धेत धुळे ते चांदवड व तेथून पुन्हा धुळे असे सायकलींगवर 200 किलोमीटरचे अंतर 13 तास 30 मिनिटात पूर्ण करावयाचे होते.
पोलीस प्रशासनातील अधिकारी सहभागी
यात जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आदिनाथ बुधवंत, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुलकुमार पाटील हे सहभागी झाले होते. त्यांनी 200 किलोमीटरचे अंतर अवघ्या 11 तासात पुर्ण केले. त्यांच्या समवेत जळगाव येथील सायकलपटू सुपर रॉन्डेनियर स्वप्निल मराठे, व सायकलपटू निशीकांत मधवानी यांनी देखील वेळेच्या आत इठच् पुर्ण केली. यशाबद्दल पोलिस प्रशासनातील सहभागी अधिकारी व सायकलपटूंचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांनी अभिनंदन केले असून सर्वत्र कौतुक होत आहे. धुळे सायकलींग स्पर्धा यशस्वितेसाठी शैलेंद्र चोरडिया, धीरज कुंवर, गौरव वाडगे आदिंचे सहकार्य लाभले.