जळगाव । खान्देशातील लोकसंस्कृतीचा आरसा असलेल्या बहुचर्चित बहिणाबाई महोत्सवाला शनिवार 11 फेब्रुवारीपासून शहरात बॅरिस्टर निकम चौक ‘सागर पार्क’ येथे प्रारंभ होणार आहे. पाच दिवस चालणार्या या महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिध्द सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी निशा जैन, सिमा भोळे, रेखा महाजन, रक्षा खडसे, डॉ. प्रिती दोषी विविध क्षेत्रातील नामवंत महिला उपस्थित राहणार आहेत.बहिणाबाई महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे. केळी कंबळ, ज्वारीचे कणीस, लॅपटॉप, गव्हाच्या ओंब्या व पुस्तकांचे पूजन व पुष्पार्पवा करुन कार्यक्रमाचे आगळ्या-वेगळ्या पध्दतीने उद्घाटन होणार आहे. मंचावर महाराष्ट्र बँकेचे उपमहा प्रबंधक निशिकांत वाघचौरे, भरत अमळकर, सुशीलकुमार झुणझुनवाला, अनिशभाई पटेल, बाळासाहेब सूर्यवंशी, डॉ. पी.आर.चौधरी, श्रीराम पाटील, आमदार चंदूभाई पटेल, कृषि अधिकारी विवेक सोनवणे, आयुक्त महानगरपालिक जीवन सोनवणे उपस्थित राहणार आहेत.
यांचा होणार सन्मान
अनिल भोकरे प्रशासकीय, अभिजित भांडे प्रशासकीय, सुजाता पाटील सामाजिक, लक्ष्मण सपकाळे प्रशासकीय, कु. नीता पाटील राष्ट्रीय बालशौर्य, मिनाक्षी निकम सामाजिक, अपर्वा भट सांस्कृतिक, हेमंत बेलसरो सामाजिक, विशाल पाटील दूरचित्रवाणी, ज्योती श्रीवास्तव शैक्षणिक, अंजली पाटील क्रीडा, नितीन वाळके कृषी, मीनल जैन (शैक्षणिक) यांना गौरविण्यात येणार आहे. याप्रसंगी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भरारी फौउंडेशन जळगावचे दीपक परदेशी यांनी केले आहे आहे. यशस्वीतेसाठी भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फौउेशन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला विकास मंडळ प्रायोजक असून महानगरपालिका जळगाव, बँक ऑफ महाराष्ट्र, शेती विभाग (महाराष्ट्र शासन), ऑकिॅड मल्टी सुपरस्पेशिलिटी हॉस्पिटल, श्रीराम स्कॅक्स, रोहनवाडी प्रोजेक्ट, लक्ष्मी अॅग्रो (कृषी सम्राट), धनलक्ष्मी ज्वेलर्स, आर्यन इको रिसोर्ट, दि जळगाव पीपल्स को-ऑप. बँक लि. प्रपोशन ग्रप हे सहप्रायोजक आहेत.