11 रुग्णांवर करण्यात आल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया

0

रावेर। रावेर येथे पुणे अंधजन मंडळ व भवरलाल आणि कांताबाई जैन फौऊंडेशन, सामाजिक कार्यकर्ते देविचंद मोतीलाल छोरिया (छोरिया गृप रावेर) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. यात सुमारे 71 वर रुग्णांची तपासणी करण्यात येवून 11 जणांना शस्त्रक्रियेसाठी जळगाव येथे नेण्यात आले. प्रसंगी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सोपान पाटील, माजी नगराध्यक्ष हरिश गणवाणी, छोरिया ग्रुपचे देवेन शाह, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, नगरसेविका शारदा चौधरी, राजेंद्र जैस्वाल, हभप कांतीलाल महाजन, भागवत चौधरी, एल.डी.निकम, सुनील चौधरी, जयंत भागवत आदी प्रमुख मान्यवर उपस्थितीत होते.

71 रुग्णांच्या डोळ्यांची करण्यात आली तपासणी
या शिबिरात डॉ. भारत साळवे यांनी सुमारे 71 रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी केली. 11 रूग्ण मोतीबिंदूचे आढळून आले. त्यांना शस्त्रक्रियेसाठी कांताई नेत्रालय जळगाव येथे पाठविण्यात येणार आहे. शिबीर यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य युवराज देसर्डा, प्रमोद जैन व रावेर येथील खान्देश माळी महासंघ तालुकाध्यक्ष पिंटू महाजन यांनी सहकार्य केले.