ठाणे महापौरपदी मीनाक्षी शिंदे बिनविरोध

0

मुंबई । भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची बिनविरोध निवड झाली तर, उपमहापौरपदी शिवसेनेच्याच रमाकांत मढवी यांची वर्णी लागली आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीत 131 पैकी 67 जागा जिंकत शिवसेनेनं निर्विवाद बाजी मारली आहे. शिवसेनेचा महापौर ही केवळ औपचारिकता उरली होती. भाजपने महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करून शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे निवडणूक होण्याची शक्यता होती.