जळगाव । आषाढीसाठी गेलेल्या जळगाव ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान (रामपेठ) संचलित श्रीसंत मुक्ताबाई राम पालखी, विविध तिर्थस्थळांचे दर्शन घेत पालखी जळगाव ते पंढरपूर व पुन्हा परतीच्या मार्गाने जळगावपर्यंत एकूण 1100 कि.मी.पायी प्रवास करीत श्रीराम मंदिर मेहरुण येथे दि. 1 रोजी शुभागमन करणार असून त्या निमित्त मेहरुण येथील श्रीराम मंदिरात रात्री 9 वाजता हभप अशोक महाराज देवरे यांचे किर्तन होणार आहे.
श्रीसंत मुक्ताई राम पालखीचा असा होता मार्ग : शिरसोली, वावडदा, बिलवाडी, वडली, पाथरी, सामनेर, नांद्रे, दुसखेडे, वेरुळी, पाचोरा, अंतुर्ली, लोहटार, नाचणखेडे, पासर्डी, कजगाव, भोरटेक, मुंदखेडे, वाकडी, रांजणगाव, भांबरवाडी, कालीमठ, मुंडवाडी, भोरटेक, चापानेर, टाकळी, बोरगाव, पळसवाडी, वेरुळ, खुलताबाद, दौलताबाद, आसेगाव, नांदेडा, एकलहर, कासोडा, तुर्काबाद खराडी, जिकठाण, लखमापूर, अमळनेर, प्रवरा संगम, नेवासे, बाभुळवेडा, वडाळा, घोडेगाव, जेऊर, शेंडी, नगर, रुईछत्तीसी, मिरचगाव, निमगाव डाकू, मांगी, कर्माळा, कंदर, टेंभुर्णी, परीते, करकंब, भोसे, पवारवस्ती, शिराढोण, माळीचिंचोरा, गंगापूर, मालुंजा, तांदुळवाडी, सिध्दनाथ, घुसर्डी, टाकळी, नगरदेवळे, गाळण, तारखेडे, खडकदेवळा, वरखेडी, आंबेवडगाव, शेंदुर्णी, पहूर, देवपिंप्री, नेरी, चिंचोली, मेहरुण
पालखी मिरवणूकीचा मार्ग
दि. 2 रोजी सकाळी 10 वाजता हभप देवदत्त महाराज मोरदे यांचे किर्तन होवून सद्गुरु आप्पा महाराज समाधी मंदिर येथे पालखीचे गावप्रवेश होईल. याप्रसंगी विविध कार्यक्रम होवून दुपारी 4 वाजता गणनाम सत्संग मंडळाच्या भजनसेवेने सांगता होईल. यानंतर निघणार्या पालखी मिरवणूकीत राजकमल चौक, सुभाष चौक, रथ चौक, सराफ बाजार, श्रीराम मंदिर, कोल्हे वाडा, गोपाळपुरा, विठ्ठलपेठ, तेली चौक, राम मारोतीपेठ मार्गे रात्री 9 वाजता श्रीराम मंदिरात समारोप होईल. समस्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिर संस्थानतर्फे करण्यात आले आहे. उत्सव सोहळ्याचे सडा संमार्जन, रांगोळीने स्वागत होईल.