Argument With Police By Calling Emergency Number : Chincholi Accused In Handcuffs यावल : अडचणीच्या वेळी मदतीसाठी असणार्या 112 आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून पोलिसांशी वाद घालणार्या चिंचोलीच्या इसमाविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली.
अधिकार्यांसह कर्मचार्याशी घातला वाद
रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक 112 वर चिंचोली येथील कैलास अशोक कोळी यांचा दूरध्वनी आला. यामुळे ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल जगन्नाथ अशोक पाटील यांच्यासह नरेंद्र बागुल, राहील गणेश, शामकांत धनगर अशांनी कैलास कोळी यास याबाबत विचारणा केली. यावरून कैलास कोळी याने अपशब्दांचा वापर करत शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.
पोलिसाच्या हाताला घेतला चावा
कैलास कोळी यास यावल पोलीस ठाण्यात शासकीय वाहनातून आणत असताना वाहनातील बिनतारी यंत्रणेस लाथा मारून तोडफोड करून त्याने नुकसान केले तसेच पोलिस ठाण्यात आल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांनी त्यास फोन बाबत विचारणा केली असता त्यांना ही कैलास कोळी याने शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून गेला. सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान व फिर्यादी जगन्नाथ पाटील यांच्या हाताला चावा घेतला या कारणावरून कैलास कोळी याचे विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे यासह विविध कलम अन्वये यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.