नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर एलपीजी सबसिडी सोडणार्या अनेकांनी सबसिडी परत घेण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 1 लाख 12 हजार 655 लोकांनी एलपीजी सबसिडी परत घेतली आहे. तशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयानेच दिली आहे. एलपीजीशिवाय राहण्यास सक्षम आहेत, त्यांनी सबसिडी सोडावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 मार्च 2015 रोजी केले होते. मात्र एलपीजी सबसिडी सोडल्यानंतर ती पुन्हा एक वर्षानंतर परत घेण्याचा पर्याय केंद्र सरकारने दिला होता. महाराष्ट्रातील सर्वात जास्त म्हणजे 22 हजार 984 जणांनी सबसिडी परत घेतली आहे. उत्तर प्रदेशच्या 13 हजार 552 जणांनी, तर राजस्थानच्या 9 हजार 955 जणांनी सबसिडी परत घेतली आहे.