0

धुळे । शहरातील पांझरा नदी किनारी दोन्ही बाजूंना प्रत्येकी साडेपाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे काम मार्गी लावले जात आहे. महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी या दोन्ही रस्त्यांचे काम मार्गी लागलेले असेल, असा विश्‍वास आमदार अनिल गोटे यांनी सभेतून व्यक्त केला़ शहरातील साक्री रोडवरील सत्य साईबाबा कॉलनी परिसरात शुक्रवारी सायंकाळी उशिरा आमदार अनिल गोटे यांची ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

झुलता पुल तयार करणार…
आमदार गोटे म्हणाले, शहरातील पांझरा नदी किनारी दोन्ही बाजूंना तयार होणार्‍या रस्त्यांवर भाजी विक्रेते, मटन विक्रेते अशा सर्वांसाठी स्टॉलची रचना करण्यात येणार आहे. शेतकरी आपला माल थेट येथे आणून विकू शकतील. मधली दलाली मोडीत काढण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. या रस्त्यातंर्गत वेगवेगळ्या सहा ठिकाणी चौपाटी असेल तसेच गणपती मंदिराजवळ झुलता पुल तयार करणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.