पुणे-सीता माता ही टेस्टयूबेबी होती असे वक्तव्य करुन भारतीय जनतेच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस महिला आघाडीतर्फे भारतीय जनता पक्षाचे नेते दिनेश शर्मा यांची अंतयात्रा काढण्यात आली.
महिला कार्यकर्त्यांनी दिनेश शर्मा यांची तिरडी उचलून ‘मर गया मर गया दिनेश शर्मा मर गया’ अशी घोषणाबाजी करीत गांजवे चौक ते वैकुंठ स्मशानभूमी पर्यत अंतयात्रा काढली. यावेळी पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक अजित दरेकर, नगरसेविका सुजाता शेट्टी, नीता रजपूत, भारती कोंडे, अनुसया गायकवाड, सुमन इंगवले, जयश्री पाटिल आदी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या अंतयात्रेचे आयोजन पुणे शहर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस संगीता तिवारी यांनी केले.