117 गरोदर मातांची वैद्यकीय तपासणी

0

भुसावळ । राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत खडका रोड नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे गौसिया नगर परिसरातील गौसिय मस्जिदजवळ गोरगरीब रुग्णांकरीता आरोग्य शिबीर घेण्यात आले. यामध्ये 117 गरोदर मातांसह 279 बालकांची तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आरोग्य समिती सभापती दिपाली बर्‍हाटे, गटनेता हाजी मुन्ना इब्राहिम तेेली उपस्थित होते.

या शिबिरात नगरसेवक महेंद्रसिंग ठाकुर, सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील, नगरपालिका रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. किर्ती फलटणकर, डॉ. जयप्रकाश खडसे, डॉ. अर्शिया शेख, डॉ. नृपाली सावकारे यांची उपस्थिती होती. यावेळी उपनगराध्यक्ष लोणारी यांनी मार्गदर्शन केले. डॉ. शगुफ्ता खान यांनी 117 गरोदर मातांची तपासणी केली. डॉ. अमोलसिंग चव्हाण यांनी 279 बालकांची तर डॉ. खडसे यांनी 131 सर्वसाधारण रुग्णांची मोफत तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले.