जळगाव । जळगाव शहरातील खेडी पेट्रोलपंपाजवळ व महमार्गालगतच्या नाल्यावर उघड्यावर शौचास बसलेल्या 12 जणांना ताब्यात घेवून टमरेल, बाटल्यासह एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. महापालिकेचा आरोग्य विभाग व पोलिसांनी सकाळी पावणेसात वाजता ही कारवाई केली. या 12 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हरिविठ्ठल नगर व पिंप्राळ्यात देखिल 6 जणांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, 12 जणांपैकी 9 जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 200 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर उर्वरित तिघांना गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
खेडीगावालगतच्या उघड्यावर मोहिम
जळगाव महानगरपालिकेतर्फे उघड्यावर शौचालयास बसणार्यांविरुध्द कारवाईची मोहिम उघडण्यात आली आहे. बुधवारी सकाळी 7.30 ही मोहीम मनपा आरोग्य निरीक्षक एन.ई.लोखंडे यांच्या गुड मॉर्निंग पथकाने केली. युनिट क्रमांक 13 मधील सालारनगर पुलाजवळ तसेच खेडीगावालगत उघड्यावर बसलेल्यांवर कारवाई करण्यात आली. उघड्यावर शौचालयास बसण्यास बंदी असतांनाही नागरीक सर्रास उघड्यावर बसुन अस्वच्छता करतात. शौचालयास उघड्यावर बसल्याप्रकरणी टमरेटासह 12 जणांना ताब्यात घेतले. त्यांना एमआयडीसी पोलीसांसमोर हजर करण्यात आले. यानंतर त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. याठिकाणी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आले मनपा सुत्रांनी सांगितले.
यांच्यावर करण्यात आली कारवाई
खेडीमधील साई दुकानाजवळील बाबुराव मगन पांचाळ (वय 33), ज्ञानेश्वर एकनाथ पांचाळ (वय 26 रा. साईदुकानाजवळ खेडी), निलेश सुकदेव कदम (वय 39 रा. शिवाजी महाराज पुतळा), मन्साराम झांबर मराठे (वय 38), शंकर बादल राठोड (वय 31), सोमवीर कश्यप (वय 25 रा. महामार्ग पुलावर), बंटी श्रीराम कश्यप (वय 26), भास्कर शिवलाल घाटोळे (वय 58), मधुकर भगवान इंधे (वय 46), आत्माराम कौतीक साळुंखे (वय 65), अरुण वसंत भालेराव (वय 42), प्रविण सुरेश राऊत (वय 24) यांच्यावर मुंबई पोलीस अधिनीयम 1951 मधील कलम 115,117 नुसार गुन्हांची नोंद करण्यात आली आहे.
200 रुपयांचा दंड ठोठावला
एमआयडीसी पोलिस ठाण्यात 12 लोटाबहाद्दरांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यातील निलेश सुकदेव कदम, मन्साराम झांबर मराठे , शंकर बादल राठोड, सोमवीर कश्यप, बंटी श्रीराम कश्यप, भास्कर शिवलाल घाटोळे, मधुकर भगवान इंधे, अरुण वसंत भालेराव, प्रविण सुरेश राऊत या नऊ जणांना न्यायाधीश शिंदे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या नऊ जणांना न्या. शिंदे यांनी प्रत्येकी 200 रुपयांचा दंड सुनावला आहे. तर गुरूवारी बाबुराव मगन पांचाळ, ज्ञानेश्वर पांचाळ, आत्माराम कौतीक साळुंखे यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.